डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वारासमोर कॅन्डल मार्च

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रियदर्शनी चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेश द्वारासमोर शनिवार रोजी कैंडल मार्चचे आयोजन करण्यात आले.

सायंकाळी ७ वाजता सर्व आंबेडकर प्रेमी उपासक उपाधिका प्रियदर्शनी चौकातील डॉ. बाबासाहेब आबेडकर प्रवेश द्वाराजवळ एकत्र झाले. रात्री ७.३० वाजता कैंडल मार्चला सुरुवात झाली. तेथून सराफा गल्लीने केंडल मार्च आबेडकर - डॉ. बाबासाहेब यांच्या डॉ. आंबेडकर नगरातील पुर्णाकृती पुतळ्या जवळ समाप्त झाले. 

प्रत्येकाने हाती घेतलेली मेणबत्ती पुतळ्या समोर लावल्या व मेनबतीच्या उजेडाने पुतळा परिसर उजळून निघाला. केंडल मार्च पुतळ्याजवळ आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली.

यावेळी जी. एस. आरके, संजय आरके रोहीत आरके पवन भूईगळ, अभिषेक आरके, धम्मा आरके, शुभम आरके, सागर आरके, संगीता आरके, सुनिता आरके, निर्मलाबाई पाईकराव, जिजाबाई आरके, रत्नमाला भुईगळ, कल्याणी आरके, दगडाबाई उगले, अमिता आरके, सविता आरके आदींची उपस्थिती होती.